Sunday, January 31, 2021

Aryadurga Devi Temple, Devihasol, Rajapur, Ratnagiri

 आर्यदुर्गा देवी मंदिर, देवीहसोळ

    आर्यदुर्गा देवी मंदिर हे राजापूर तालुक्यातील देवीहसोळ गावातील प्रसिद्ध देवस्तान आहे. हे मंदिर राजापूरपासून २५ किमी आणि मुंबईपासून ३७७ किमी अंतरावर आहे. आर्यदुर्गा देवी आणि नवदुर्गा देवी (भालवली) ह्या मंदिरात होणाऱ्या जत्रौउत्सवाला अनेक भाविक दर्शनचा लाभ घेतात. नवरात्रीच्या आठव्या दिवशी हा उत्सव होतो. आर्यादुर्गा देवी हि कराड ब्राह्मणांची कुलदेवता आहे. महाकाली मंदिर, आदिवारे, मार्लेश्वर मंदिर आणि गणपतीपुळे मंदिर जवळच आहे.

    आर्यदुर्गा देवीचे मुख्य मंदिर उत्तर कर्नाटकातील अंकोला या ठिकाणी आहे. याव्यतिरिक्त देवीची इतर मंदिरे सिंधुदुर्ग जिल्यात कुडाळ आणि कणकवली आणि रत्नागिरी जिल्यात राजापूर तालुक्‍यातील देवीहसोळ भागात आहेत. आर्यदुर्गा देवीची सर्व मंदिरे जागृत देवस्थान आहेत.

देवीची कथा :-

    एक व्रात्सारू नावाचा राक्षस होता, तो अतिशय बलवान, निर्दयी आणि क्रूर होता, प्रजा त्याचा क्रूरतेला कंटाळे होते. तो संपूर्ण पृथ्वीवर राज्य करत आहेस, आणि त्याने स्वर्गावर आक्रमण केले आणि इंद्रेदेवाला स्वर्गलोकातून पलायन करायला भाग पडले, इंद्रदेवानी त्रिमूर्तीकडे (ब्रह्मा, विष्णू, महेश) धाव घेतली, तेव्हा त्रिमूर्तीनी इंद्रदेवाला सांगितलं कि तुम्ही देवी पार्वतीला शरण जा, तेव्हा इंद्रदेव देवीकडे गेले आणि घडलेली सर्व घटना देवीला सांगितली, तेव्हा देवीने राक्षसाला युद्धाचे आवाहन केले आणि  भगवान महादेवाने त्रिशूल देवीला दिले, भगवान विष्णूने त्यांचे सुदर्शन चक्र दिले, ब्रह्माने त्यांना ब्रह्मा दिले, वरुणदेवने वरुणपेशा दिला, वायुदेवाने आपला दिव्य धनुष्य दिला, अग्निदेवाने दैवी शक्ती दिली, तेव्हा देवीने आर्यदुर्गा देवी नावाने अवतार घेतला आणि राक्षसाचा वध केला. तेव्हा पासून त्यागावी देवीचा वास आहे. 

    देवीहसोळ गावी पळसुळे देसाई नावाचे एक व्यक्ती राहत असे, ते देवीभक्त होते, ते प्रत्येक वर्षी आर्यदुर्ग देवीच्या दर्शनासाठी अंकोला (कर्नाटक) भागात देवीच्या मंदिराकडे जात असत, पण पुढे वयोमानामुळे त्यांना जमत नसे, तेव्हा देवीचे दर्शन घेऊन निघताना देवीने त्यांना द्रूष्टांत दिला आणि सांगितलं मी तुझ्याकडे येते पण मागे वळून बघू नको, तेव्हा देसाई गावात आल्यावर त्यांना पैंजणाचा आवाज येऊ लागला तेव्हा त्यांनी मागे वळून पहिले तर तिथे त्यांना देवीने दर्शन दिले आणि तेव्हापासून देवीहसोळ गावात आर्यदुर्गा देवीचा स्थापन झाली असे सांगितले जाते.  

    राजापूरच्या विडीयोसाठी click करा :- Mi Rajapurcha Youtube and like, share करा आणि subscribe वर click करायला विसरू नका आणि ब्लॉगला follow करा.

Thank You

Mi Rajapurcha
मी राजापूरचा




Monday, January 18, 2021

धूतपापेश्वर मंदिर - Dhutpapeshwar Temple, Rajapur, Ratnagiri.

धूतपापेश्वर मंदिर हे धोपेश्वर गावातील जागृत स्वयंभू देवस्थान आहे. महादेवाचा अवतार असून सर्व पापांना धुऊन काढणारा देव आहे, म्हणून धूतपापेश्वर हे नाव पडले. चला जाणून घेऊया धूतपापेश्वर देवाची संपूर्ण माहिती :- 


 ठिकाण :- 

मुंबईपासून सुमारे ४५० किमी वर राजापूर शहर आहे आणि राजापूर शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर हे धोपेश्वर गाव आहे. गावात धूतपापेश्वर मंदिर आहे. 


धूतपापेश्वर देवाची कथा :- 

राजापूरात निळोबा भट नावाचे एक गृहस्थ राहत होते. परिस्थितीने गरीब असूनही जे काही मिळेल त्यात ते समाधानी होते. काशीविश्वेवर दर्शन आणि गंगास्नान करण्यास हे काशीला जात असत. पण नंतर वयोमानामुळे काशीला जाणे शक्य नव्हते. ते शिवभक्त होते त्यामुळे त्यांना शिव दर्शनाची ओढा लागली होती आणि त्यात त्यांच्या घरी असलेल्या गाईने अचानक दूध देण्याचे बंद केले. म्हणून त्यांनी गुराख्याला गाईवर पाळत ठेवयाला सांगितले. एकदा गुराख्याने रानात गाईला झाडाखाली पान्हा सोडताना पहिले, हे पाहून रागावलेल्या गुराख्याने त्या झाडाखालच्या खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्याबरोबर त्या खडकाचा एक लहान तुकडा उडून कासर्डे गावी पडला आणि त्याचे 'कपालेश्वर' लिंग झाले. गुराख्याने हि घटना निळोबा भटांना सांगितली. निळोबा भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग दिसले. त्यांना ते पाहून खूप वाईट वाटले. आजहि ते स्वयंभू शिवलिंग तुटलेलेच आहे. तुटलेले खडक पाहून गाईने बाजूच्या डोहात उडी घेतली (कोटीतीर्थात) आणि गाई पाठोपाठ निळोबा भटांनीही प्रायश्चित म्हणून कोटीतीर्थात देहविसर्जन केले. अशी ही भावपूर्ण कथा आहे.

मंदिर स्थापत्त्य :- 

या मंदिराचा लाकडी सभामंडप असून त्याचे छत कौलारू आहे. सभा मंडपाच्या छताला आकर्षक रंगीत पताक्यांची सजावट आहे आणि नक्षीकाम असलेले खांब आहेत. त्यावरील मारुती, कमळ, मासे, मोरपीस असे लाकडातील कोरीवकाम हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सभोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून मंदिर प्राचीन आहे. मोठे सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह आहे. मंदिरात येताचक्षणी मन शांत आणि प्रसन्न होते. प्रवेशद्वारावर नगारखाना व आवारात दीपमाळा आहेत. सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.


मंदिराची काही खास वैशिष्ट्ये :-

१) मंदिराच्या बाजूला काळ्या कातळावरून खाली झोकून देणाऱ्या मृडानी नदीचे पाणी नजरेला वेगळेच सुख देते. कोसळणाऱ्या पाण्याचा नितांत सुंदर धबधबा आहे. धबधब्याचे खरे सौंदर्य ऐन पावसाळ्यात खुलून दिसते. वरून खाली पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह झाला आहे त्याला “कोटितीर्थ" असे म्हणतात आणि त्यात सुंदर शिवलिंग आहे. त्यावर पाणी पडताना पाहणे हे वेगळे नेत्र सुख आहे. 

२) निसर्गाने जणू हिरव्या गर्द झाडीत हे मंदिर वसलेले आहे.

३) महादेवाला वाहिला जाणारा कैलासचाफ्याचे सुंदर झाड या एकमेव ठिकाणी पहायला मिळते. 

४) धूतपापेश्वर मंदिराच्या बरोबर मागे पूर्ण काळया पाषाणात कामेश्वराचे सुंदर मंदिर आहे. 

५) धुतपापेश्वर मंदिरात सुंदर गणेश मूर्ती आहे आणि त्या समोर नवग्रहाची मूर्ती आहे, जणू गणराज नवग्रहांवर लक्ष ठेऊन आहेत. 

६) धूतपापेश्वर मंदिराच्या बाजूला धबधब्या पलीकडे दत्तात्रय मंदिर आहे आणि धूतपापेश्वर मंदिरासमोर सुंदर दीपमाळा आणि तीच्या बाजूला श्री वीरभद्र देवाचे मंदिर आहे. दीपमाळेच्या वरच्या बाजूला श्री वेताळेश्वर देवाचे मंदिर आहे. 

६) दररोज रात्री शेवटची महापूजा होते आणि शंकर-पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा (सोंगट्यांचा) खेळ मांडला जातो आणि गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात तेव्हा ह्या सोंगट्या विखुरलेल्या आढळतात. असे दररोज होत नाही आणि होईलच असे नाही शक्यतो (सोमवार, गुरुवार, अमावास्या, महाशिवरात्र, श्रावण सोमवार) यावेळी जास्त होते. येथील भाविकांची श्रद्धा आहे की भगवान शंकर-पार्वती येते येऊन सारीपाट खेळून जातात.

७) पेशवेकाळातील सरदार बिनीवाले यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर सोन्याचा मुकूट भेट दिला होता.जो आजही पुजेत वापर करतात. 

८) मृडानी नदीच्या काठावर असले हे मंदिर नदीच्या दोन्ही बाजूंच्या मोठ्या डोंगरांमध्ये आहे. मृडानी नदी डोंगरावरून खाली येताना मंदिराजवळच एक धबधबा तयार झाला आहे. जुलै ते नोव्हेंबर या काळात या धबधब्याला भरपूर पाणी असते. पावसाळ्यात येथे भाविक आणि पर्यटक यांची गर्दी असते.


राजापूरच्या विडीयोसाठी click करा :- Mi Rajapurcha Youtube and like, share करा आणि subscribe वर click करायला विसरू नका आणि ब्लॉगला follow करा.

Thank You Mi Rajapurcha मी राजापूरचा





Sunday, December 27, 2020

आतुरता शिमगो उत्सवाची २०२१ The Ferocity of Shimgo Festival 2021

 आतुरता शिमगो उत्सवाची २०२१

The Ferocity of Shimgo Festival 2021

Shimga (Holi) tradition of Konkan – A Celebration of Happyness. Holi celebration in Konkan is different from other cities of India, this is really great to celebrate, this festival is a tradition of Konkani culture for that u must watch below video:-

Rajapur - Holi Dev होळदेव (शिमगा - 2020), शेंगाळेवाडी, विलये, राजापूर #MiRajapurcha


Rajapur - शिमगा (कोकणातील होळी) उत्सव 2020 - Shimga Utsav 2020 at konkan #MiRajapurcha


Rajapur शेंगाळेवाडी शिमगो उस्तव २०१८ ठिकाण :- शेंगाळेवाडी, विलये, राजापूर,रत्नागिरी#MiRajapurcha



Gomucha Nach Shimgotsav (Holi dance) #MiRajapurcha


Rajapur Shegalewadi - Dhardadevichi palkhi धारदादेवीची पालखी पाळेकरांच्या घरी(Dt. 05-04-2011)


Rajapur - Shengalewadi (Vilaye) शिमगो होळी एक सुंदर क्षण 2017


Rajapur - Shengalewadi (Vilaye) शेंगाळेवाडीचे खेळे ( शिमगो होळी) 2017


Rajapur - Shengalewadi (Vilaye) शिमगो (होळी) उस्तव २०१७ (शेंगाळेवाडी, राजापूर, रत्नागिरी)



राजापूरच्या विडीयोसाठी click करा :- Mi Rajapurcha Youtube and like, share करा आणि subscribe वर click करायला विसरू नका.

Thank You Mi Rajapurcha मी राजापूरचा






Friday, December 4, 2020

Short Poem and Sholok (Comedy) at the time of bhojan pangat In Konkan Rajapur Ratnagiri

राजापूरातील जेवनाच्या पंगतीतल्या गमती आणि श्लोक

 #Rajapur #MiRajapurcha #Konkan #Culture

https://youtu.be/SYDtP7ArF18




राजापूरातील जेवनाच्या पंगतीतल्या गमती आणि श्लोक

राजापूरच्या विडीयोसाठी click करा :- Mi Rajapurcha Youtube and like, share करा. Thank You Mi Rajapurcha मी राजापूरचा