आर्यदुर्गा देवी मंदिर, देवीहसोळ
आर्यदुर्गा देवी मंदिर हे राजापूर तालुक्यातील देवीहसोळ गावातील प्रसिद्ध देवस्तान आहे. हे मंदिर राजापूरपासून २५ किमी आणि मुंबईपासून ३७७ किमी अंतरावर आहे. आर्यदुर्गा देवी आणि नवदुर्गा देवी (भालवली) ह्या मंदिरात होणाऱ्या जत्रौउत्सवाला अनेक भाविक दर्शनचा लाभ घेतात. नवरात्रीच्या आठव्या दिवशी हा उत्सव होतो. आर्यादुर्गा देवी हि कराड ब्राह्मणांची कुलदेवता आहे. महाकाली मंदिर, आदिवारे, मार्लेश्वर मंदिर आणि गणपतीपुळे मंदिर जवळच आहे.
देवीची कथा :-
एक व्रात्सारू नावाचा राक्षस होता, तो अतिशय बलवान, निर्दयी आणि क्रूर होता, प्रजा त्याचा क्रूरतेला कंटाळे होते. तो संपूर्ण पृथ्वीवर राज्य करत आहेस, आणि त्याने स्वर्गावर आक्रमण केले आणि इंद्रेदेवाला स्वर्गलोकातून पलायन करायला भाग पडले, इंद्रदेवानी त्रिमूर्तीकडे (ब्रह्मा, विष्णू, महेश) धाव घेतली, तेव्हा त्रिमूर्तीनी इंद्रदेवाला सांगितलं कि तुम्ही देवी पार्वतीला शरण जा, तेव्हा इंद्रदेव देवीकडे गेले आणि घडलेली सर्व घटना देवीला सांगितली, तेव्हा देवीने राक्षसाला युद्धाचे आवाहन केले आणि भगवान महादेवाने त्रिशूल देवीला दिले, भगवान विष्णूने त्यांचे सुदर्शन चक्र दिले, ब्रह्माने त्यांना ब्रह्मा दिले, वरुणदेवने वरुणपेशा दिला, वायुदेवाने आपला दिव्य धनुष्य दिला, अग्निदेवाने दैवी शक्ती दिली, तेव्हा देवीने आर्यदुर्गा देवी नावाने अवतार घेतला आणि राक्षसाचा वध केला. तेव्हा पासून त्यागावी देवीचा वास आहे.
देवीहसोळ गावी पळसुळे देसाई नावाचे एक व्यक्ती राहत असे, ते देवीभक्त होते, ते प्रत्येक वर्षी आर्यदुर्ग देवीच्या दर्शनासाठी अंकोला (कर्नाटक) भागात देवीच्या मंदिराकडे जात असत, पण पुढे वयोमानामुळे त्यांना जमत नसे, तेव्हा देवीचे दर्शन घेऊन निघताना देवीने त्यांना द्रूष्टांत दिला आणि सांगितलं मी तुझ्याकडे येते पण मागे वळून बघू नको, तेव्हा देसाई गावात आल्यावर त्यांना पैंजणाचा आवाज येऊ लागला तेव्हा त्यांनी मागे वळून पहिले तर तिथे त्यांना देवीने दर्शन दिले आणि तेव्हापासून देवीहसोळ गावात आर्यदुर्गा देवीचा स्थापन झाली असे सांगितले जाते.
राजापूरच्या विडीयोसाठी click करा :- Mi Rajapurcha Youtube and like, share करा आणि subscribe वर click करायला विसरू नका आणि ब्लॉगला follow करा.
Thank You
मी राजापूरचा
No comments:
Post a Comment